22/07/2026
Sending little flower मधुमालती 🌼
मधुमालती (इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे. बहराच्या काळात लालपांढऱ्या फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो मधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फांदीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार पण टोकाला निमुळता होत गेलेला (acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.
मधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो. फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फु�