13/06/2023
बांबू लागवडीतून एटीएम कार्ड तयार करा
1)बांबू लागवड करून मुंबईत बसून गावाकडे पेन्शन तयार करा.
2)बांबू लागवड या पुढे शेती म्हणून उपक्रम राबवा .सह्याद्री कडची जमीन बांबू लागवडीसाठी पोषक आहे.
3 ) दरवर्षी 50,100,असे एकूण 1000 ते 1500 ते तीन ते चार हजार बांबू पाच ते दहा वर्षात वर्षात लागवड करायचे टार्गेट ठेवा.
4 )शक्यतो एक वर्ष झालेल्या बांबू,लावा.हा चिवा भरीव असतो.त्याच्या बेटीला 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य आहे.पिढयानपिढया उत्पन्न देतो.याला मोठी मागणी असल्याने व्यापारी लोक कोकणातील स्थानिक प्रजातीला पसंत करतात.
5)मुंबईत राहून बांबू शेतीकडे लक्ष देऊ शकतो .एकदा बांबू लावून जिवंत राहिला की ,नंतर लक्ष दिले नाही तरी त्याची पाच वर्षात बेट तयार होते.आणि जर का मशागत केली तर जास्त उत्पन्न मिळते.
6 )एकदा बेट तयार झाली की स्वतः तुम्ही त्या माध्यमातून तुमचे एटीएम कार्ड तयार होईल.आणि कधीही पैसे घेऊ शकता.
7 ) आंबा,काजूच्या बागेत वाढलेले गवत ही एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.गवतामुळे वणवे लागण्याचे प्रकार घडतात आणि शेतकऱ्याने वाढविलेली जिवाभावाची बाग डोळ्यासमोर जळून खाक झालेली पाहण्याची वेळ नशिबात येते.तसेच बागेंतील गवत काढायला मजूरीचा खर्च जास्त येतो.बांबूचं तसे नाही.बांबूच्या बेटीच्या उष्णतेने गवताचा नाश होतो.शेत स्वच्छ राहते.वणवा लागला तरी त्याची झळ मुळांना पोचत नाही.
8 )बांबूला पाण्याची गरज भासत नाही.आणि पाणी मिळाले तर त्यातून दुप्पट उत्पन्न मिळते.तसेच बदलत्या हवामानाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.
9)इतर कोणतेही झाड तोडायचे झाल्यास वन खात्याची परवानगी लागते.पण बांबू वनस्पतीची गणना गवतात केली जाते.त्यामुळे बांबू तोडायला आणि वाहतूक करायला कोणाचीही परवानगी लागत नाही.या कटकटी नसल्याने आपण स्वतः व्यापारी होऊ शकतो.
10)ज्यांनी मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली आहे.त्यांना उत्पन्न भरघोस मिळते.असे कोकणात बरेच शेतकरी आहेत.
11)बांबूच्या लागवडीसाठी शासनाचे अनुदान मिळते.पण त्यांच्या अटी पूर्ण कराव्या लागतात.या साठी तालुका कृषी खात्यात मार्गदर्शन केले जाते.
12)काजू किवा आंब्याच्या बागेतील फळे चोरून नेली जातात.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते.बांबूची चोरी होत नाही.आणि लपवून घेऊन जाण्यासारखी वस्तू नाही
13)बांबूची बेट तयार झाली की ,त्यातील बांबू तोडून विकण्यासाठी आपल्याला मजुरीचा खर्च येत नाही.व्यापारी स्वतः बांबू तोडतो.तोच मजूर पाहून मजुरी देतो.बांबूची किती तोड झाली.ते आपण मोजायचे आणि पैसे घेयाचे.आज एका बांबूची कमीत कमी 50 रुपये आहे.
14 ) भविष्यात मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड झाली तर तुमचे एका चिव्याचे मूळ (मातृवृक्ष )200 ते 250/ रुपयापर्यंत जाग्यावर विकले जाईल आणि त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल.
एवढे लिहिण्याचे तात्पर्य म्हणजे कोकणातील पडीक जमिनीत बांबू लागवड हे ग्रीन गोल्ड
समजले जाते..ते कधी कोणाला उमगले नाही.या पुढे प्रत्येकाने आपल्या जमिनीत बांबू लागवड करण्यासाठी आम्ही जनजागृती करीत आहोत.त्यामुळे काही लोक बांबू लागवड करण्यासाठी पुढे आले आहेत.ही शुभ लक्षणे समजतो.पुढचा जून महिना येयला अवधी आहे .आणखी बरेच तरुण बांबू लागवडीसाठी पुढे येतील.यासाठी चाकरमान्यांच्या बैठका लवकरच होतील .बांबू मिळविणे,लागवड करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात ज्यांनी बांबू लागवड केली आहे.त्यांच्या मुलाखती घेऊन आपल्यापार्यंत मार्गदर्शन पोचविले जाईल.शासनाच्या योजना कळविल्या जातील.पण शासनाच्या भरवशावर हे शक्य होणार नाही.यासाठी थोडे थोडे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करायला हवेत.आम्ही मात्र जनजागृती करू.सकारात्मक विचारसरणीच्या लोकांनीच या अभियानात सामील व्हावे.नाहीतर ज्यामुळे आपले नशीब पालटवून टाकेल अशा गंभीर आर्थिक विषयाचा पंचनामा इथे खिल्ली उडविण्यात पार पाडतील आणि करणाऱ्याला त्यापासून परावृत्त केले जाईल.त्याकडे दुर्लक्ष करा.नकारात्मक विचारसरणीच्या लोकांचे हे काम असते.कोणी काय सुचविले की त्यांच्या तोंडात जिथे तिथे ''पण"शब्द आडवा येतो.हा पण शब्द कोकणासाठी कलंक ठरला आहे.या पण भोवती गुंतागुंतीच्या अनेक गोष्टी असतील.त्या सोडवायचा प्रयत्न केल्या तर त्या साऱ्या सहजपणे दूर होतील.दुसर अस की कोकणात परंपरेप्रमाणे लोकांत हरियाली सारखी नाकोरी जडली आहे.तीही मुळासकट उखडून टाकली पाहिजे.तरच हे शक्य आहे.आणि जे करतील त्यांचे भवितव्य उज्वल आहे.यात काय शंका नाही.चीन या देशाची अर्थव्यवस्था बांबूवर चालते मग आपली का नाही याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.
ज्ञानेश्वर रावराणे