06/03/2024
🙏 नमस्कार ग्राहकहो ! 🙏
🥳 कळवण्यास अत्यंत आनंद होतो की "प्राईमा इंजीनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन सर्विसेस" ने प्रथमच बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या सर्वथा सेवेसाठी आणि या क्षेत्रामध्ये काहीएक गुणवत्ता व सुव्यवस्था राखण्यासाठी एक तंत्रप्रणाली विकसित केली आहे. सोबतच, ग्राहकांना आपला बांधकामप्रवास सुकर, समाधानी आणि किफायतशीर व्हावा यासाठी व्यवस्थापन पातळीवर जाणिवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत. आपले बांधकाम लहान असो वा मोठे, खाली नमूद केलेली आमची 'प्रभावी व्यवस्थापन प्रणाली' (Effective Administration System) आपल्या सर्वांच्या सोईची राहिल हीच आशा :
1. कामाच्या सुरुवातीस संपूर्ण कामाचे 'प्रकल्प व्यवस्थापन पत्रक' जारी केले जाईल ज्यामध्ये कामाचे टप्पे, लागणारा वेळ, एकमेकांवरचे अवलंबित्व, प्रत्येक टप्प्यावर येणारा खर्च आणि हे सर्व नमूद असलेले 'प्राईमा विषेश दिनदर्शिका' 📊दिली जाईल. जेणेकरून आपले नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल.
2. दुसरे पत्रक असेल बांधकामाचे आर्थिक आणि वस्तू नियोजनाचे (Estimation and Quantity survey)📜, यामध्ये बांधकामाच्या प्रत्येक घटकाचे मोजमाप, त्या-त्या टप्प्यावर लागणारे सामान यांचे अंदाजपत्रक दिले जाईल.
3. काम सुरू असताना गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रत्येक कामाच्या स्वतंत्र अशा 'गुणवत्ता सुची' (Quality Checklist) 📝 जारी करतो, ज्या संबंधित इंजिनीअर्स कडून पडताळल्या जातात व त्याचा अहवाल तुमच्याकडे दिला जातो जेणेकरून नजरचुकीने होणार्या चुका कटाक्षाने टाळल्या जाव्यात.
4. सोबतच काम सूरु असताना वेळोवेळी अचुक ड्रॉईंग्ज तर दिले जातीलच पण त्यासोबतच Cloud storage ☁ ची सुविधा दिली जाईल ज्याद्वारे तूम्ही तुमचे सर्व अद्ययावत ड्रॉईंग्ज, 3D चित्रे, वरील सर्व पत्रके एकाच लींकद्वारे कधीही पाहू शकता.
5. त्याचबरोबर वरील सर्व कामाच्या व्यवस्थापनासाठी व प्राईमा व आपल्यामधील सहकार्य प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आपल्यासाठी अनुभवी असा 'प्रोजेक्ट को-ओर्डिनेटर' 👷♀ नेमला जाईल. जो आपल्या कामामध्ये जातीने लक्ष घालेल सोबतच आपल्या सहकार्यासाठी नेहमी तत्पर असेल.
या सगळ्याबरोबर प्राईमाचे अनुभवी इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, 3D व्हिज्वलायझर्स आपल्या सोबत असतीलच, आपले काम एका नव्या उंचीवर नेण्यासाठी.
आणखिन एक महत्वाचे, वरिल प्राईमा स्पेशल सेवांचे कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही.
मग वाट कसली बघताय 🤔, आत्ताच आपल्या प्रकल्पाची नोंदणी करा.
संपर्क: 9850068464"प्राईमा इंजीनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन सर्विसेस"
प्राईमा प्रस्तुत.