Perfeckt Construction Solution

Perfeckt Construction Solution we are giving you one stop solution for Construction, Maintenance & Real Estate. we are constructio

14/08/2026

पेवर ब्लॉकसारखा सुंदर लूक… पण तुमच्या काँक्रीटच्या सरफेसवरच! ✨🏗️

ओल्या सिमेंट मोर्टारवर विशेष मेटल शेप्स प्रेस करून तयार केलेली ही आकर्षक डिझाईन फिनिशिंग — पार्किंग, वॉकवे, अंगण आणि ओपन एरियासाठी एक सुंदर पर्याय.

तुमच्या जागेला द्या स्टायलिश आणि प्रीमियम लूक! 🔥

Perfect Construction Solution
Construction & Maintenance – One Point Solution
📞 Er. Nilesh Pawar – 9405923226

सर्विस एरिया - रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा

13/08/2026

Paver Block Fitting.
🏗️ Perfeckt Construction Solution & Services
🌟 तुमचं स्वप्न – आमचं ध्येय!
👨‍💼 आमच्याबद्दल
आम्ही कोकणातील चिपळूण, खेड, गुहागर,दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी या भागात 15+ वर्षांचा अनुभव असलेली बांधकाम सेवा पुरवतो.
पर्यावरणपूरक पद्धतीने जांभ्या दगडात घरे, व्हिला आणि रिझॉर्ट्स बांधणे हे आमचं काम आहे.

🏡 आमच्या सेवा
• घर, व्हिला आणि रिझॉर्ट्स बांधकाम
• प्लॅनिंग व डिझायनिंग
• NA प्लॉट डेव्हलपमेंट
• Renovation & Maintenance
• आधुनिक + पारंपरिक आर्किटेक्चर
• पेस्ट कंट्रोल
• जांभा / चिरा कारविंग वर्क
• गार्डन आणि लँडस्केपिंग
• पेव्हर ब्लॉक वर्क
• प्लंबिंग वर्क

🌿 आमची वैशिष्ट्यं
• पर्यावरणपूरक बांधकाम
• तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण कामगिरी
• आधुनिक डिझाईन्स + कोकणी परंपरा
• वेळेत काम पूर्ण
• विश्वास आणि पारदर्शकता

📞 संपर्क
Er.Nilesh Pawar
Civil Engineer | Founder – Perfect Construction Solution & Services
✉️ [email protected]

📍चिपळूण, खेड, गुहागर,दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी
📱 +91 9405923226 / 8087161707
✅ कोकणात तुमचं स्वप्नातील घर बांधायचं आह

12/08/2026

#प्लंबर आणि #कॉन्ट्रॅक्टर यांच्यासाठी सर्वात इनोव्हेटिव्ह गोष्ट जी तुमचं काम अचूक आणि सोपं करू शकते.

अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
भारत हार्डवेअर चिपळूण
Mo. 9405923226

12/08/2026

🐟 कोकणचा अस्सल स्वाद म्हणजे ताज्या माशांची मेजवानी! 🌊❤️

KonkanLife

11/08/2026

🏠 स्लायडिंग विंडो ग्रॅनाईट बसवताना ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट!

खिडकीसाठी ग्रॅनाईट फिटिंग करताना आम्ही खालच्या बाजूस डबल ग्रॅनाईट पट्टी (Double Sill Detail) देतो. बाहेरील पट्टी खाली आणि आतील पट्टी थोडी उंच ठेवल्यामुळे पावसाचे पाणी खिडकीवर पडूनही घराच्या आत शिरत नाही.

अनेक ठिकाणी ही काळजी घेतली जात नाही आणि नंतर पावसाळ्यात खिडकीतून पाणी घरात येण्याची समस्या निर्माण होते. योग्य डिझाईन आणि तांत्रिक पद्धतीने केलेले कामच भविष्यातील अडचणी टाळते.

✅ Rainwater Protection
✅ Proper Granite Sill Design
✅ Long-Term Durability
✅ Professional Finishing

Perfect Construction Solution & Services
📍 Planning | Designing | Construction | Renovation

30/05/2026

💧 आज आणखी एक ड्रिप इरिगेशन प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला ! 🌱
या प्रोजेक्टमध्ये 5000 लिटर क्षमतेच्या 3 PVC पाण्याच्या टाक्या बसवून तिला पंप कनेक्शन देण्यात आले. तसेच संपूर्ण क्षेत्रासाठी मुख्य ड्रिप लाईन टाकून स्प्रिंकलर सिस्टीम बसवण्यात आली.

पाण्याची बचत, पिकांना योग्य प्रमाणात सिंचन आणि शेतीची वाढती उत्पादकता यासाठी आधुनिक सिंचन प्रणाली हा उत्तम पर्याय आहे. 🌿

✅ 5000 लिटर PVC टाकी इंस्टॉलेशन
✅ पंप कनेक्शन
✅ मेन लाईन नेटवर्क
✅ स्प्रिंकलर फिटिंग
✅ संपूर्ण प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण

📞 ड्रीप पाईपलाईन,प्लंबीग, कन्स्ट्रक्शन व इतर कृषी प्रकल्पांसाठी संपर्क करा. (संपूर्ण रत्नागिरी जिल्हा)
इंजि. निलेश पवार
मो. 9405923226

#

23/05/2026

कोकणात फणस काढण्याची पारंपरिक कला 😊
उंच झाडावरचा फणस सुरक्षितपणे दोरीच्या साहाय्याने खाली उतरवण्याची ही कोकणातील जुनी आणि भन्नाट पद्धत! ❤️
अनुभव, कौशल्य आणि निसर्गाशी असलेलं नातं याचं सुंदर उदाहरण 🌿

कोकणातील गावाकडचं जीवन आणि आपल्या मातीतली परंपरा जपणारा हा छोटासा क्षण 🙌

#फणस #कोकण

05/04/2026

📢 *Job Opportunity*
आमच्या *Perfeckt Construction Solution* ऑफिस (चिपळूण) साठी खालील पदासाठी उमेदवार हवा आहे:

🏗️ Position:

*Civil Draftsman / Site Supervisor*

🎯 पात्रता:

* किमान *ITI Draftsman Civil*
* AutoCAD चे बेसिक ज्ञान असणे आवश्यक
* कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग वाचता येणे आवश्यक

🛠️ कामाचे स्वरूप:-

* साईट वरती जाऊन *Measurement घेणे व Estimate तयार करणे*
* साइटवर जाऊन ड्रॉइंग नुसार काम करून घेणे व *Supervision करणे.*

📍 Location:- Chiplun

📞 संपर्क:

इंजि.निलेश पवार
मो. 9405923226

👉 अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल
👉 इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा

वॉल हँग कमोड बसवताना घ्यायची महत्वाची काळजी.आजकाल बाथरूममध्ये Wall Hung Commode बसवण्याची पद्धत वाढत आहे. पण अनेक ठिकाणी...
25/03/2026

वॉल हँग कमोड बसवताना घ्यायची महत्वाची काळजी.

आजकाल बाथरूममध्ये Wall Hung Commode बसवण्याची पद्धत वाढत आहे. पण अनेक ठिकाणी एक मोठी चूक केली जाते – कमोड डायरेक्ट भिंतीवर बोल्टने बसवला जातो. हे नेहमी सुरक्षित नसते.

बर्‍याचदा काय होते की भिंत विटांची किंवा जांभा दगडाची असते. जर दगड किंवा विटा मजबूत नसतील किंवा भिंत थोडी नरम असेल तर कमोडचे बोल्ट कालांतराने लूज होतात. कमोड वापरायला लागल्यानंतर तो हलायला लागतो, त्याची पोझिशन बदलते आणि पुढे क्रॅक येणे किंवा कमोड तुटण्याची शक्यता सुद्धा असते.

यासाठी Chair Bracket / Frame System वर Wall Hung Commode बसवणे जास्त मजबूत आणि सुरक्षित असते.

Chair Bracket चे फायदे:-

* पूर्ण वजन भिंतीवर न जाता फ्रेमवर येते
* कमोड हलत नाही
* बोल्ट लूज होत नाहीत
* जास्त वर्षे मजबूत राहतो
* मेंटेनन्स कमी
* वापरताना सेफ्टी जास्त
* Soft wall / Jambha stone / Brick wall साठी उत्तम

महत्वाची सूचना:-

Wall Hung Commode बसवताना नेहमी
Direct wall mounting पेक्षा Chair Bracket Frame System वापरणे जास्त सुरक्षित आणि टिकाऊ असते.

अशा प्रकारचे Plumbing, Bathroom Work, Renovation, Commode Installation इत्यादी कामांसाठी संपर्क करा.

Perfeckt Construction Solution
Chiplun, Ratnagiri
मो. 9405923226

24/03/2026

आजकाल घराच्या पॅसेज, बाल्कनी, जिन्याजवळ किंवा कंपाऊंड वॉलमध्ये Terracotta जाळी ब्लॉक वापरून खूप सुंदर आणि नैसर्गिक डिझाईन करता येते. यामुळे घराला पारंपरिक कोकणी आणि मॉडर्न असा दोन्ही लूक मिळतो.

Terracotta जाळीचे सर्वात मोठे फायदे म्हणजे हवा आणि लाईट दोन्ही घरात येतात पण प्रायव्हसी सुद्धा कायम राहते. त्यामुळे पॅसेज, बाल्कनी, जिना एरिया, पार्किंग साईड वॉल, बाउंड्री वॉल या ठिकाणी हे खूप उपयुक्त आहे.

# # # Terracotta जाळीचे फायदे:

* घरात नैसर्गिक हवा येते
* सूर्यप्रकाश येतो पण उष्णता कमी येते
* प्रायव्हसी मिळते
* घराचा elevation सुंदर दिसतो
* मेंटेनन्स कमी असतो
* कोकणातील घरांसाठी खूप योग्य
* नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक मटेरियल

# # # Terracotta जाळी वापरण्याच्या आयडिया:

* Balcony Side Wall
* Staircase Wall
* Passage Partition
* Parking Side Wall
* Compound Wall Design
* Garden Seating Background Wall
* Terrace Design Wall

अशा प्रकारचे Terracotta जाळी फिक्सिंग, कंपाऊंड वॉल, पॅसेज डिझाईन, बाल्कनी डिझाईन इत्यादी कामे आम्ही करून देतो.

Perfeckt Construction Solution
Chiplun
मो. 9405923226

Address

Shop No. 3, Mariyam Apartment, Uktad Fata
Chiplun
415605

Telephone

+918087161707

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfeckt Construction Solution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Perfeckt Construction Solution:

Shortcuts

Share