Trimiti Architect

Directions Website

Trimiti Architect At Trimiti Architect, we're all about turning architectural and interior design dreams into reality.

02/09/2026

सुंदर 3D Elevation = चांगलं Building Planning?

नेहमीच नाही.

एका project मध्ये 3D View खूप attractive होता; पण actual Planning पाहिल्यावर awkward spaces, कमी natural light आणि furniture planningच्या अडचणी दिसल्या.

म्हणून Architect final करण्याआधी फक्त Fees आणि 3D compare करू नका.

या 3 गोष्टी तपासा:

1️⃣ Actual Completed Projects
2️⃣ Working Process + Site involvement
3️⃣ तुमच्या गरजा समजून योग्य guidance देण्याची क्षमता

चांगल्या Architect ची खरी value फक्त Drawings मध्ये नसते—construction सुरू होण्याआधी किती चुकीचे decisions टाळता येतात, यातही असते.

Dream Building Journey – Day 09

घर बांधण्याचा विचार करणाऱ्या मित्राला हा Reel Send करा.

31/08/2026

स्वतःची जागा आहे… म्हणून थेट बांधकाम सुरू करता येतं?

नाही.

महाराष्ट्रात बांधकाम सुरू करण्यापूर्वी योग्य Building Permission, Sanctioned Plan आणि आवश्यक Commencement Approval समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

कारण Plot समोरील Road Width, Margins, लागू UDCPR Rules आणि तुमची Property Documents यावर तुमचा Building Plan ठरतो.

चुकीच्या Planning मुळे पुढे: ❌ Plan Reject होऊ शकतो
❌ Bank Loan मध्ये अडचण येऊ शकते
❌ Unauthorized Construction चा प्रश्न निर्माण होऊ शकतो

काम सुरू करण्यापूर्वी 3 गोष्टी:

✅ Property Documents अपडेट ठेवा
✅ लागू Rules नुसारच Plan Design करा
✅ Approved Plan मिळाल्यावरच Construction सुरू करा

Legal Compliance म्हणजेच शांत झोप.

हा Reel Save करा आणि घर बांधण्याचा विचार करणाऱ्या मित्राला Share करा.

Dream Building Journey – Day 08
Baandhkam Story

28/08/2026

कागदावर Plot 50 फूट… पण प्रत्यक्षात तो 48 फूटच निघाला तर? 😳

शेजाऱ्याचं Encroachment, चुकीचं Road Demarcation किंवा जुन्या Boundary Marks मुळे कागदावरची मोजणी आणि प्रत्यक्ष Site मध्ये फरक असू शकतो.

म्हणून Construction सुरू करण्यापूर्वी Digital Total Station Survey करून या 3 गोष्टी नक्की तपासा:

✅ Boundary Points
✅ Total Plot Area
✅ Site Constraints

आणि Survey करताना फक्त चार Boundaries नाही—Plot Level, Road Width, Electric Lines, Drain आणि आसपासच्या महत्त्वाच्या Site Conditions सुद्धा नोंदवून घ्या.

कारण Accurate Survey झालं तर पुढचं Building Planning खूपच अधिक Practical होतं.

🏡 Dream Building Journey – Day 07

घर बांधण्याचा विचार करणाऱ्या मित्राला हा Reel नक्की Share करा.

Save करा — Plot Final करण्यापूर्वी ही माहिती पुन्हा उपयोगी पडेल.




27/08/2026

Massive Concrete is being poured on one site with help of 2 Concrete Pumps and 15+ RMC vehicles.

Guess for what.? Let me know in comments.

26/08/2026

Soil Test न करता घराचं Foundation ठरवणं योग्य आहे का?

“शेजाऱ्याने Soil Test केली नाही, त्याचं घर तर व्यवस्थित आहे!” — हा विचार अनेकांचा असतो.

पण वरून सारखी दिसणारी जमीन खालीसुद्धा सारखीच असेल, असं अजिबात नाही.

विशेषतः Black Cotton Soil, भरावाची जमीन, नवीन Layout किंवा नदी-नाल्याजवळचा Plot असेल तर जमिनीची वास्तविक स्थिती समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

कारण Soil Condition नुसार Foundation Design बदलू शकतं — कुठे Isolated Footing, कुठे Raft, तर काही परिस्थितीत Pile Foundation ची गरज लागू शकते.

म्हणून Soil Test कडे फक्त “अतिरिक्त खर्च” म्हणून पाहू नका. योग्य ठिकाणी केलेली तपासणी पुढे होणारा मोठा structural risk आणि अनावश्यक खर्च टाळण्यास मदत करू शकते.

काम सुरू करण्याआधी तुमच्या Architect / Structural Engineer ला नक्की विचारा: “माझ्या Plot साठी Soil Test आवश्यक आहे का?”

Dream Building Journey – Day 06

घर बांधण्याच्या तयारीत असाल तर हा Reel Save करा आणि ज्यांचं बांधकाम सुरू होणार आहे त्यांच्यासोबत share करा.

24/08/2026

तुमच्या प्लॉटमध्ये Black Cotton Soil / काळी माती आहे म्हणून घर बांधणं धोकादायक ठरतं का? 🤔

अजिबात नाही.

खरी अडचण Black Cotton Soil मध्ये नसते — चुकीच्या Foundation Planning मध्ये असते.

काळी माती पावसाळ्यात फुगते आणि उन्हाळ्यात आकसते. त्यामुळे योग्य Soil Investigation आणि Foundation Design नसेल, तर पुढे भिंतींना आणि Floor ला cracks येण्याची शक्यता वाढते.

✅ योग्य Soil Testing
✅ योग्य Foundation Design
✅ योग्य Murrum Filling / Stone Soling
✅ गरजेनुसार योग्य Foundation System

हे निर्णय अंदाजाने घेऊ नका.

घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा Reel Save करा आणि ज्यांचा प्लॉट Black Cotton Soil मध्ये आहे अशा मित्राला नक्की Share करा.

🏡 Dream Building Journey – Day 05
अशाच Practical Building Guidance साठी Baandhkam Story Follow करा.

22/08/2026

₹50–60 लाखांचं Budget… आणि घर पूर्ण होईपर्यंत ₹70–80 लाख खर्च! असं का होतं?
कारण घर बांधताना फक्त Contractor चा Per Sq.Ft. Rate = Total Project Cost असं समजणं ही मोठी चूक आहे.
Budget मधून अनेकदा हे 3 मोठे खर्च सुटतात:

1️⃣ Approvals & Professional Fees
2️⃣ Finishing Costs
3️⃣ External Development Costs

आणि म्हणूनच काम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर Budget कमी पडतं आणि मग Tiles, Doors, Interiors किंवा इतर Quality वर compromise करण्याची वेळ येते.
काम सुरू करण्यापूर्वी Item-wise Budget Sheet + Material Checklist तयार करा आणि किमान 10% Contingency Fund बाजूला ठेवा.
Dream Building Journey – Day 04

20/08/2026

घर बांधण्याआधीच लाखोंचं नुकसान होऊ शकतं!

आणि त्यासाठी Construction सुरू होण्याचीही गरज नाही.

❌ दुसऱ्याचा Plan कॉपी करणे
❌ फक्त 3D Elevation पाहून Design Final करणे
❌ Total Budget न ठरवणे
❌ Future Needs चा विचार न करणे
❌ Architect आधी Contractor Final करणे
❌ फक्त सर्वात कमी Quote निवडणे

या चुका सुरुवातीलाच टाळल्या, तर पुढे होणारा अनावश्यक खर्च आणि अनेक अडचणी टाळता येतात.

चांगलं घर Site वर नाही, आधी Design Table वर तयार होतं.

Dream Building Journey – Day 03

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी घर बांधण्याचा विचार करत असेल तर हा Reel SAVE + SHARE करा.

Follow Baandhkam Story for practical Architecture & Construction guidance.



18/08/2026

प्लॉट घेताना केलेली एक चूक तुम्हाला पुढे लाखो रुपयांना महाग पडू शकते!

फक्त Price आणि Location पाहून Plot Final करू नका.

प्लॉट घेण्यापूर्वी नक्की तपासा 👇

📌 Plot Level
📌 Black Cotton Soil / Soil Type
📌 Filling किंवा Excavation
📌 High-Tension Line / Nala
📌 7/12 आणि NA Status
📌 Plot Shape & Building Restrictions

आणि सर्वात महत्त्वाचं —

Token देण्यापूर्वी अनुभवी Architect कडून एक Site Visit करून घ्या.आजचा छोटासा खर्च उद्याचं लाखोंचं नुकसान वाचवू शकतो.

Dream Building Journey – Day 02

घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही Series SAVE करा.

आणि सध्या Plot शोधत असलेल्या व्यक्तीला हा Reel नक्की SHARE करा. ↗️

— Ar. Mukesh Jadhav
Baandhkam Story

16/08/2026

घर बांधायचं ठरवलंय? मग नकाशा बनवण्याआधी स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा.

तुम्ही खरंच घर बांधण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या तयार आहात का?

अनेक लोक प्लॉट आहे किंवा Home Loan मिळतंय म्हणून उत्साहात बांधकाम सुरू करतात. पण बजेट कमी पडलं की काम अर्धवट राहतं किंवा शेवटी Quality मध्ये compromise करावा लागतो.

बांधकाम सुरू करण्यापूर्वी तपासा:

- अनपेक्षित खर्चासाठी Financial Buffer आहे का?
- पुढील 5 वर्षांच्या कुटुंबाच्या गरजांचा विचार केला आहे का?
- Home Loan EMI आरामात भरू शकता का?

माझ्या 18+ वर्षांच्या Architecture आणि Construction अनुभवातून — एकूण अंदाजित बांधकाम खर्चाच्या किमान 25% Liquid Cash स्वतःकडे उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. केवळ 100% Loan वर अवलंबून राहू नका.Dream Building Journey – Day 01

घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही संपूर्ण Series Save करा आणि पुढील भागांसाठी Follow करा.

उद्या — Plot घेताना होणाऱ्या महागड्या चुका!



Address

Garkheda
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Trimiti Architect posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share